दूध उत्पादक व सेंद्रिय शेती करणाऱ्यांना जिव्हाळापुरस्काराचे वितरण
उदगीर (प्रतिनिधी) : डॉ. अनिल भिकाने संचालक,विस्तार शिक्षण,माफसू नागपूर व उदगीर येथील प्रसिद्ध व्यापारी, सेवाभावी कार्यकर्ते रामराव मोमले यांचे वाढदिवस जिव्हाळा ग्रुपने अभिनव पद्धतीने साजरे केले.
शेतीनिष्ठ शेतकरी अमृतराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष, डॉ. रामप्रसाद लखोटिया व मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद लोखंडे यांच्या उपस्थितीत व रमेश अण्णा अंबरखाने यांच्या शुभहस्ते, दूध उत्पादक व सेंद्रिय शेती करणारे शेतकरी, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे डॉ.प्रफुल्ल कुमार पाटील इत्यादींना शाल,स्मृतिचिन्हासह
जिव्हाळा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे मानकरी, श्याम भाऊ सोनटक्के ,लोहारा, भागवतराव केंद्रे, कुमठा, दिगंबरराव बिरादार माळवाडीकर, शेख अजमत अय्युबमिया, उदगीर, चंद्रकांत पांचाळ निडेबन, मेघराज मूडपे गुडसूर.
ह्या प्रसंगी रमेश अण्णा अंबरखाने म्हणाले की,जिव्हाळा ग्रुप त्यांच्या सदस्यांचे वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरे करतो. हे कार्य कौतुकास्पद, व अनुकरणीय आहे. डॉ. रामप्रसाद लखोटिया म्हणाले की, निरोगी राहण्यासाठी विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन करणे ही काळाची गरज आहे. विश्वनाथराव माळेवाडीकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर श्याम भाऊ सोनटक्के, डॉ. प्रफुल्ल कुमार पाटील, देविदासराव नादरगे, दशरथ शिंदे, विश्वनाथ मुडपे, शंकरराव साबणे
इत्यादींनी सत्कार मूर्तींचे अभिष्टचिंतन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिडवे यांनी केले तर शंकराव केंद्रेनी उपस्थितान्चे आभार मानले.
डॉक्टर अनिल भिकाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत रोडगे, अशोक हळ्ळे, विवेकानंद मोमले, वैजनाथ पंचगल्ली, मारुती रोडगे, सच्चिदानंद पुट्टेवाड, मनोहर कुलकर्णी, सुधीर वाडेकर इत्यादींनी परिश्रम घेतले.