अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील यशवंत विद्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक माधव वाघमारे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजीराव सूर्यवंशी, विभाग प्रमुख कपिल बिराजदार, राजेश कजेवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील निवडक मुला मुलींनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय समारोप पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांच्या भाषणाने झाला.
सूत्रसंचालन समीक्षा तुडमे, अक्षरा मठपती यांनी तर आभार श्रुती कांबळे यांनी मांनले.