राज्यकर्त्यांनी संविधानातील मूल्यावर आधारित मानवी कल्याणाचे कार्य करावे- डॉ.विठ्ठल दहिफळे

0
राज्यकर्त्यांनी संविधानातील मूल्यावर आधारित मानवी कल्याणाचे कार्य करावे- डॉ.विठ्ठल दहिफळे

राज्यकर्त्यांनी संविधानातील मूल्यावर आधारित मानवी कल्याणाचे कार्य करावे- डॉ.विठ्ठल दहिफळे

उदगीर (प्रतिनिधी) : संविधानाची अंमलबजावणी करणारी राज्यसत्ता महत्त्वाची आहे. व्यक्ती,सृष्टी आणि समष्टी यांच्याशी एकरूप होऊन मूल्य व्यवस्था प्रस्थापित करण्याची गरज आहे. राज्यकर्त्यांनी संविधानातील मूल्यावर आधारित मानवी कल्याणाचे कार्य करावे. असे उद्गार पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील प्रा.डॉ.विठ्ठल दहिफळे यांनी काढले. ते येथील शिवाजी महाविद्यालयात भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यशास्त्र विभागाने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी भारतीय संविधानातील मूल्य आणि त्यांचा व्यवहार या विषयावर बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते. तर प्रमुख व्याख्याते पीपल्स महाविद्यालय नांदेड येथील राज्यशास्त्राचे प्रा. डॉ. विठ्ठल दहिफळे हे होते.यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव पी.टी.शिंदे, संस्थेचे संचालक पुंडलिकराव पाटील,माजी प्राचार्य विजयकुमार पाटील,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर .एम.मांजरे, प्रबंधक बालाजी पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्ही.डी. गायकवाड यांची होती.पुढे बोलताना डॉ. दहिफळे म्हणाले की, भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करताना संविधानातील आदर्श मूल्याप्रमाणे राज्यकर्त्यांनी मानवी कल्याणाचे कार्य करावे.भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ मूल्यावर आधारित आहे.स्वातंत्र्य,समता,न्याय,
धर्मनिरपेक्षता, सहिष्णुता हे तत्व समाजात रुजणे आवश्यक आहे. तरच सामाजिक न्यायाची संकल्पना अस्तित्वात येईल व समाजाचा सर्वांगीण विकास घडून येईल, असे ते म्हणाले .
अध्यक्षाच्या वतीने अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ. आर. एम. मांजरे म्हणाले की, भारताच्या संविधानाने मूलभूत हक्क,कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे यातून समाजाला आधुनिक विकास करण्याची समान संधी दिलेली आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्ही.डी. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.एस.एम. कोनाळे यांनी तर डॉ. विष्णू पवार यांनी आभार मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *