तळेगावच्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही – दिलीपराव देशमुख
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्यात जमिनीच्या मालकी हक्काच्या दावा करणाऱ्या नोटिसा आल्या होत्या तळेगावातील 103 शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने भीतीयुक्त वातावरणात वावरताना दिसून येत आहेत नोटीस आलेल्या काही शेतकऱ्यांनी या नोटीस वक्फ बोर्डाकडून आल्या असल्याचे निवेदनात म्हटल्यामुळे लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे अनेक माध्यमावरून या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी या नोटीसा वक्फ बोर्डाकडून आल्या नसल्याचे स्पष्ट केले होते .
आज तळेगाव येथे भारतीय जनता पक्षाचे लातूर जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी तळेगाव गावात जाऊन नोटीस मिळालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांनी या प्रकरणातील सर्व घटनाक्रम दिलीपराव देशमुख यांना सांगितला असता दिलीपराव देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिलासा देत “घाबरून जाऊ नका कायदेशीर लढा उभारून तज्ञ वतीलामार्फत या प्रकरणात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन दिले ” त्याचबरोबर या प्रकरणात जर कोणी पैशाची मागणी केली तर कृपया कोणालाही पैसे देऊ नका असे सांगितले सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडील सर्व पुरावे कोर्टाकडे सादर करून या जमिनी आमच्या मालकीच्या आहेत हे सिद्ध करून ज्यांनी या जमिनीवर दावा केला आहे तो खोडून टाकता येईल असे याप्रसंगी दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.