शिवाजी महाविद्यालयाच्या किसान वार्षिकांकास विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर

0
शिवाजी महाविद्यालयाच्या किसान वार्षिकांकास विद्यापीठाचा पुरस्कार जाहीर

उदगीर (प्रतिनिधी) येथील शिवाजी महाविद्यालय प्रत्येक वर्षी नवीन थीम घेऊन किसान वार्षिकांक काढत असते. 2023-24 मध्ये महाविद्यालयाने ‘ भारतीय स्वातंत्र्यलढा ‘ येथील घेऊन वार्षिक अंक प्रकाशित केला. यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी,उर्दू,संस्कृत अशा विषयाच्या अनुषंगाने भारतीय स्वातंत्र्यलढा यावर अभ्यासपूर्वक लेख लिहिले. त्यांना मार्गदर्शन कार्यकारी संपादक प्रा.डॉ.नरसिंग कदम, संपादक मंडळ सदस्य डॉ.एम.एफ.नदाफ, प्रा.बालाजी सूर्यवंशी,प्रा.डॉ.पी.डी. माने,प्रा.डॉ.एन.डी.शिंदे यांनी केले. हा वार्षिकांक अतिशय सुबक,आकर्षक, आखीव रेखीव व अभ्यासपूर्वक व्हावा यासाठी तत्कालीन प्रभारी प्राचार्य डॉ.अरविंद नवले आणि सर्व संपादक मंडळांनी अतिशय मेहनत घेतली.यांना महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लावले. हा वार्षिकांक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पारितोषिक स्पर्धेसाठी पाठविण्यात आला होता. विद्यापीठाने नुकताच या वार्षिकांकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर केलेला आहे. किसान वार्षिक अंकास उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कार्यकारी संपादक प्रा.डॉ.नरसिंग कदम, संपादक मंडळ सदस्य डॉ.एम.एफ.नदाफ यांच्या वतीने डॉ.शेख एम. एन. यांचा, प्रा.बालाजी सूर्यवंशी,प्रा.डॉ.पी.डी. माने,प्रा.डॉ.एन.डी.शिंदे यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील होते, तर प्रमुख उपस्थिती प्र.प्राचार्य डॉ.आर.एम.मांजरे, माजी प्राचार्य डॉ.अरविंद नवले, आयक्यूयेसी समन्वयक डॉ.विष्णू पवार, स्टाफ सेक्रेटरी डॉ.संजय निटुरे, प्रबंधक बालाजी पाटील, डॉ .व्ही.डी. गायकवाड, डॉ.एम.एन. शेख, डॉ.एस.डी.सावंत, डॉ.डी.बी.मुळे, डॉ.ए.एस.टेकाळे, प्रा विवेक पवार यांची होती. किसान वार्षिक अंकास विद्यापीठाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाल्याबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील,उपाध्यक्ष माधवराव पाटील,सचिव पांडुरंगराव शिंदे,सहसचिव हिरागीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, कार्यकारिणी सदस्य ज्ञानदेव झोडगे,
रामराव एकंबे, काकासाहेब पाटील, भिमराव पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *