उदगीर कोनाळे कोचिंग क्लासेसच्या 19 विद्यार्थ्यांचे डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत ऐतिहासिक यश,९४ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण
उदगीर (एल.पी.उगीले): डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा 2024 मध्ये कोनाळे कोचिंग क्लासेस, उदगीरच्या 19 विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या अविस्मरणीय कष्टाचे फळ म्हणून ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केली आहे. व दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत हे विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
कोनाळे कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी आणि शिक्षकांचे समर्पण आणि कष्ट यामुळे या वर्षीची परीक्षा एक ऐतिहासिक घटना बनली आहे. 19 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी या प्रतिष्ठित परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे, जे उदगीर शहरासाठी अभिमानास्पद ठरले आहे, उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी कोंडळे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी केल्याबद्दल
सर्व विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले जात आहे.
इयत्ता ६ वी मधून मगर समर्थ (७५), मोरे श्रीशैल्य (७२),कुमठेकर सोहम (६९),महिंद्रकर राधिका (६९),बिरादार कृष्णाली (६६),पाटील दीपाली (६५),
जाधव श्रेयस (६४),बिरादार श्रेया (६२), दंडीमे आरव (५९),पाटील दीपक (५८) या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे तसेच इयत्ता ९ वी मधून,बंडेवार ईशान (७१),मटवाड कात्यायनी (७१),जाधव समर्थ (६४),
गोरे आदित्य (६३),जाधव पुरुषोत्तम (६१),झेरकुंटे स्नेहा (५९),हिप्पळगे अथर्व (५८),दरवेशवार साक्षी (५७),
कोतागडे अर्जुन (५४) या गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांनी उदगीर शहराचे नावलौकिक केले आहे.
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या प्रगल्भतेचा अनुभव देणारी शैक्षणिक योजना, नियमित मार्गदर्शन आणि कठोर मेहनतीमुळे हे यश प्राप्त झाले आहे. “आजचा दिवस कोचिंग क्लासेसच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी लिहिला जाईल. आम्ही अधिकाधिक विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे प्रा. व्हि. डी. कोनाळे व आबा कदम यांनी आनंद व्यक्त करत सांगितले.
या यशामुळे कोनाळे कोचिंग क्लासेसच्या शिक्षण पद्धतीला अधिक प्रोत्साहन मिळाले असून, त्यांचे भविष्य खूपच उज्ज्वल आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना देशभरातील प्रमुख विद्यार्थ्यांसह दुसऱ्या टप्प्यातील प्रात्यक्षिक परीक्षेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे, आणि यामुळे उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होईल.
कोनाळे कोचिंग क्लासेसच्या या ऐतिहासिक यशामुळे उदगीर शहराचे नाव अजूनच उजळले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरले आहे.
या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे क्लासेसतर्फे संचालक आबा कदम, सौ. ज्योती कदम,समन्वयक जयंत कुलकर्णी, भानूविलास बिरादार, जशन डोळे यांनी अभिनंदन केले आहे.