उदगीर सायकलिंग क्लब निघाले 35 सायकलस्वार निघाले अयोध्या, प्रयागराज, वाराणसीला

0
उदगीर सायकलिंग क्लब निघाले 35 सायकलस्वार निघाले अयोध्या, प्रयागराज, वाराणसीला

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर सायकलिंग क्लबच्या 35 उत्साही सायकलस्वांरानी मृदा संवर्धनाचा संदेश घेऊन उदगीरहून आयोध्या वाराणसी असा प्रवास महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या तीन राज्यातून जाणारा हा 1500 किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवर पूर्ण करणार आहेत.
या सायकल प्रवासाची सुरुवात उदगीर येथील दुधीया हनुमान येथून निघून श्रीराम मंदिर चे दर्शन घेऊन येथून सुरूवात होणार आहे. प्रवास करताना प्रत्येक शहरात रँलीच्या माध्यमातून उदगीर ते वारंगा फाटा, यवतमाळ, नागपूर, शिवनी, जबलपूर, मेहर, चाकघाट, प्रयागराज, आयोध्या, जैनापुर, वाराणसी असा 1500 कि.मी. किलोमीटर अंतराचा प्रवास 10 दिवसात पूर्ण करणार आहेत.
साईनाथ कोरे, सुनिल ममदापूरे यांच्या नेतृत्वाखाली सायकलस्वार 2002 सालापासून दरवर्षी उदगीर ते तिरुपती हे अंतर सायकलवर पूर्ण करणारी, ही उदगीर मधील विविध क्षेत्रात कार्यरत असणारी मंडळी, या त्यांच्या भक्तीपूर्ण सायकलस्वारीला दरवर्षी सामाजिक आणि पर्यावरण संदेशाची जोड देऊन, समाजाप्रती असलेले त्यांचे उत्तरदायित्व अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमांतून सातत्यपूर्ण पणे निभावत आहेत.
उदगीर सायकलींग क्लब चे हे सायकलस्वार बुधवार, दिनांक 25 डिसेंबर 2024 ला त्यांच्या या मोहिमेस प्रारंभ करून दि. 03 जानेवारी 2025 रोजी ते श्रीराम मंदिर आयोध्या येथे पोहचणार आहे.

या वर्षी सुद्धा सायकल टीम कॉन्शियस प्लॅनेट Save Soil (माती वाचवा) उपक्रमासाठी काम करत आहे, जो ईशा फाऊंडेशनचा एक आउटरीच प्रकल्प आहे आणि मृदा संवर्धन आणि पुनरुज्जीवन याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी काम करत आहे. 2017 मध्ये रामेश्वरम-” रॅली फाॅर रिव्हर्स- नद्यांसाठी रॅली”, 2018 मध्ये महाबलीपुरम् -“ईशा विद्या”, आणि 2019-20 मध्ये कोइंम्बतूर-“कावेरी कॉलींग” 2021 मध्ये कन्याकुमारी “कॉन्शियस प्लॅनेट” Save Soil तसेच 2022 मध्ये जगन्नाथ पुरी “कॉन्शियस प्लॅनेट” Save Soil (माती वाचवा), 2023 मध्ये तिरुवनंतपुरम (केरळा) या ईशा फाउंडेशनच्या सोशल आउटरीच प्रकल्पांसाठी त्यांनी असाच सायकलींग द्वारे सहभाग नोंदवून लांबचा पल्ला गाठलेला असून. ईशा फाउंडेशन च्या उपक्रमात सहभागी व्हायचे हे त्यांचे सलग सातवे वर्ष आहे.
उत्साही सायकलस्वार हाफ आयर्न मॅन विजेते गोविंद रंगवाळ तसेच योगीराज बारोळे वय वर्षे 13 हा देखील या सायकल प्रवासात आहे.
सायकलींगचा एक वेगळा मापदंड निर्माण करणाऱ्या आणि उदगीरकरांची शान असणाऱ्या या टीम मध्ये साईनाथ कोरे, सुनील ममदापूरे, विनोदकुमार टवानी, भास्कर कुंडगीर, ज्ञानेश्वर चंडेगावे, अश्विन पांढरे, नागनाथ वारद, दीपक पाटील, कपिल वट्टमवार, नितीन जुल्फे, चंद्रकांत ममदापूरे, गोविंद रंगवाळ, मुकेश निरूने, रितेश तिवारी, कैलास वडजे, भीमाशंकर बहिरेवार, पांडुरंग पाटील, हरिप्रसाद दंडीमे, मुकुंद चव्हाण, विवेक बिरादार, प्रेमनाथ मोदी, महेंद्र मादलापुरे, कपिलदेव कल्पे, बिरादार सतीशकुमार, प्रमोद बुटले, मोरे संतोष, रामेश्वर तोंडारे, सचिन पंदीलवार तसेच सहकारी म्हणून गणेश गुंडरे, सुधीर जिरोबे, माधव हालकुडे, पंडित डोईफोडे हे सहभागी आहेत.
समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *