तिर्रट जुगार खेळणाऱ्यावर गुन्हा दाखल, 63 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त.
लातूर (एल.पी.उगीले) स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने अवैध धंद्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. जुगाराच्या विरोधातही वेळोवेळी प्रसिद्ध माध्यम आणि आवाज उठवल्यानंतर आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखाच सक्रिय होऊन धाडी टाकत आहे. तिर्टत जुगार खेळणाऱ्या वर कारवाई करत 63 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर शहरातील सिद्धेश्वर चौक ते रत्नापूर चौक जाणारे रोड लगत असलेल्या नामदेव सलगर यांच्या पत्राच्या शेडच्या पाठीमागे मोकळ्या जागेत छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 6 जणांना ताब्यात घेतले आहे.
यामध्ये 63 हजार 540 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिद्धेश्वर चौक ते रत्नापूर चौक कडे जाणाऱ्या रोडवरील नामदेव सलगर यांच्या पत्राच्या शेडच्या पाठीमागे मोकळ्या जागेत 22/12/2024 रोजी रात्री छापा टाकण्यात आला. यादरम्यान 6 आरोपी तिर्रट नावाचा जुगार पैसे लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यामध्ये रोख रक्कम 63 हजार व जुगाराचे साहित्य जप्त केला आहे. यामध्ये आरोपी अमोल लक्ष्मण शिंदे, (वय 42 वर्ष राहणार रत्नापूर चौक लातूर), सिद्धेश्वर विष्णू तोडकर, (वय 24 वर्ष, राहणार कासारगाव तालुका जिल्हा लातूर),निलेश अनिल मोहिते, (वय 24 वर्ष, राहणार कासारगाव तालुका जिल्हा लातूर), जरीफ तैमूर शेख, (वय 30 वर्ष, राहणार तेली गल्ली, लातूर),प्रसाद प्रकाश जाधव, (वय 23 वर्ष, राहणार हरंगुळ खुर्द तालुका जिल्हा लातूर), सागर संजय मगर, (वय 24 वर्ष, राहणार सिद्धेश्वर चौक लातूर).
यांच्याविरुद्ध गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास गांधी चौक पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलिस अमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, नितीन कटारे, मनोज खोसे, चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे यांनी केली आहे.