श्यामलाल शैक्षणिक संकुल मध्ये 27 डिसेंबर रोजी अभिव्यक्ती 2024 अंतर्गतकला, संस्कृति, इतिहास महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
( 27 डिसेंबर दिवशी एक शाम श्यामलाल के नाम अंतर्गत उदगीर मधील श्यामलाल शैक्षणिक संकुल मध्ये अभिव्यक्ती 2024 चे आयोजन)
उदगीर (प्रतिनिधी) श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था, उदगीर अंतर्गत चालणाऱ्या श्यामलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्यामार्य कन्या माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, श्यामलाल प्राथमिक विद्यालय, पारिजात शिशुविहार व शिवाजी विद्यालय रोहिणा या सर्व आस्थापनातील सर्व विद्यार्थ्यांसाठी भव्यदिव्य अभिव्यक्ती 2024 ‘ एक शाम शामलाल के नाम ’ अंतर्गत कला, संस्कृती इतिहास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये नृत्य, अभिनय, वेशभूषा, गीत गायन, स्वरचित काव्यवाचन, मेहंदी, पाककला , भित्तिपत्रक व चित्रकला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन अशा विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुपोषपाणी आर्य यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्यासाठी प्रत्येक वर्षी श्यामलाल कला, क्रीडा व विज्ञान अकॅडमी अंतर्गत भव्य दिव्य व्यासपीठ विद्यार्थ्यांना मिळवून दिले जाते.
विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीस भव्यदिव्य मंच मिळावे आणि विद्यार्थी राज्य , राष्ट्रीय व जागतिक पातळीपर्यंत पोहोचावे आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिभेस गगन भरारी मिळावी या रास्त अपेक्षेतून या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी श्यामलाल संकुल मध्ये करण्यात येते.
सर्वांच्या आठवणीत असलेले वहीच्या शेवटच्या पानावर, अजब गजब देश सजग, लेझर शो, शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप, मराठवाडा मुक्तिसंग्राम वर आधारित ‘बखर हौतात्म्याची’ अशा विविध महानाट्य व भव्यदिव्य अभिव्यक्तीचे आयोजन श्यामलाल कला क्रीडा व विज्ञान अकॅडमी अंतर्गत करण्यात आले होते. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्यामलाल कला क्रीडा व विज्ञान अकॅडमी माध्यमातून
‘एक शाम श्यामलाल के नाम’अंतर्गत भव्यदिव्य कला, संस्कृती इतिहास महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कला प्रदर्शन 4.30 ते 6.30 या वेळेत तर विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम 6.30 ते 8.30 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.
सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सर्व विद्यार्थी पालक व प्रतिष्ठित व्यक्तींना उपस्थित राहण्याचे आवाहन श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणी आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर सचिव विक्रम संकाये , सहसचिव अंजुमनीताई आर्य व सर्व आस्थापना प्रमुखांनी केले आहे.