उदगीर शहर भाजपच्या वतीने अटलबिहारी बाजपेयी यांना अभिवादन

0
उदगीर शहर भाजपच्या वतीने अटलबिहारी बाजपेयी यांना अभिवादन

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त शहर भाजपच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, सुधीर भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, ऍड. सावन पस्तापुरे, रामेश्वर पवार, आनंद बुंदे साईनाथ चिमेगाव, यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अटलबिहारी बाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने शहर भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या वाजपेयी यांच्या चरित्रात्मक पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी जि. प. अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी अटलबिहारी बाजपेयी यांनी संघर्षातून भारतीय जनता पक्षाची उभारणी केली आहे. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात केलेल्या अणूचाचणी मुळे भारताने जगात आपला दबदबा निर्माण केला. त्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम केले आहे. आजच्या भाजप कार्यकर्त्यांसाठी एक प्रेरणादायी ऊर्जा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अटलजींच्या नेतृत्वाकडे पाहिले जात असल्याचे मत राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ऍड. दत्ताजी पाटील यांनी केले. यावेळी चंद्रचकोर कारखाने ,दिलीप मजगे, रामेश्वर चांडेश्वरी,आनंद साबणे, सुजित जीवने, मारोती कोटलवार, सुनील गुडमवार, मनोज धावडे, धोंडीराम मोरे, मारुती शिरनिवार, दीपक नागठाणे, संतोष बडगे, वेंकट काकरे, संजय पाटील, चेतन सूर्यवंशी, विजय पवार, रमेश गड्डमेवार ,रवी कसले, साई वाघमोडे, सरोजा वारकरे, श्यामला कारामुंगे, उषा माने, शिवकर्णा अंधारे, जया काबरा, मंदाकिनी जीवने, बबिता पांढरे, शिवगंगा बिरादार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *