उदयगिरीत साने गुरुजी यांना अभिवादन
उदगीर : (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनविशेष समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पांडुरंग सदाशिवराव साने उर्फ साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंती निमित्त प्राणीशास्त्र विभागातील डॉ. प्रवीण शेटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्राध्यापक सचिव डॉ. भालचंद्र करंडे, दिनविशेष समिती प्रमुख डॉ. गौरव जेवळीकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. बालाजी होकरणे, डॉ. दीपक चिद्दरवार, डॉ. मुकेश कुलकर्णी, प्रा. प्रशांत वाघमारे, कार्यालय प्रमुख दयानंद स्वामी यासह अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.