भाजपच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान करणार : आ. बनसोडे

0
भाजपच्या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा योग्य तो सन्मान करणार : आ. बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून आणण्यासाठी भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे. त्यांचे उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. आगामी काळात भाजपच्या सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आपण योग्य तो सन्मान करू. अशी निःसंदिग्ध ग्वाही माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत उदगीर मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आ. संजय बनसोडे हे दुसऱ्यांदा ऐतिहासिक मतांनी निवडून आल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपच्या शहर कार्यालयात आ. संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, सुधीर भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुपे, बापूराव यलमटे, विजय निटूरे, मनोहर भंडे, नंदकुमार नलंदवार, रामचंद्र मुक्कावार, ऍड. बस्वराज पाटील कौळखेडकर, ऍड. सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आ. बनसोडे यांच्यावर पुष्पवृष्टी करून औक्षण करून उत्साहात स्वागत केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री आ. बनसोडे म्हणाले की, मागच्या पाच वर्षात आपण मोठ्या प्रमाणात विकासकामे करून उदगीर मतदार संघाचा कायापालट केला आहे. आगामी काळातही आपणा सर्वांच्या सहकार्याने हा विकासाचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून आ. बनसोडे यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे करीत असताना कसलाही दुजाभाव करणार नसल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बुथप्रमुख, शक्तीप्रमुख, यांच्यासह प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःला उमेदवार समजून मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याची मला जाणीव असून या सर्वांना सोबत घेऊन महायुती बळकट करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आ. बनसोडे म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या आमदार महोदयाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करून आगामी काळात महायुती आणखी भक्कम करण्यासाठी एकमेकांच्या हातात हात घालून काम करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ऍड. दत्ताजी पाटील यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक रामेश्वर पवार, आनंद बुंदे, अमोल अंक्कल्ले,उदय ठाकूर, सुजित जीवने, मारोती कोटलवार, दीपक शिंदे, रवी कासले, अनिल मुदाळे, अमर सूर्यवंशी, अशोक वाकुडे, सुनील गुडमेवार,राहुल आपटे, चैतन सूर्यवंशी, केशव रंगवाड, अनिकेत गुडमेवार, विजय मामुलवार, शक्तिमान मद्देवार,सुशील आपटे, साई आपटे,विजय पवार, सरोजा वारकरे, श्यामला कारामुंगे, उषा माने, शिवकर्णा अंधारे, जया काबरा, मंदाकिनी जीवने, बबिता पांढरे, शिवगंगा बिरादार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *