पत्रकारांनी आपल्या लिखाणाची उंची वाढवणे काळाची गरज..! -विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे प्रतिपादन

0
पत्रकारांनी आपल्या लिखाणाची उंची वाढवणे काळाची गरज..! -विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे प्रतिपादन

पत्रकारांनी आपल्या लिखाणाची उंची वाढवणे काळाची गरज..! -विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे प्रतिपादन

साहित्य संगीत कला अकादमीच्या दर्पण पुरस्काराचे वितरण

अहमदपूर (गोविंद काळे) : हल्लीचे युग आता स्पर्धेचे युग आहे.माध्यम क्रांती मूळे वाचकांना बहूपर्याय उपलब्ध होत असून पत्रकारांनी आपल्या लिखानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच आपल्या लिखाणाची उंची वाढविणे ही आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी
येथील साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने ‘दर्पण सेवा गौरव पुरस्कार’ आणि दर्पण जीवन गौरव पुरस्काराचे वितरण तसेच पत्रकारांचा सत्कार आणि व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बब्रुवान खंदाडे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, अ‍ॅड.निखील कासनाळे,माजी सभापती बालाजी गुट्टे,माजी अध्यक्षा सरस्वतीबाई कांबळे, रिपाई तालुकाध्यक्ष अरूणभाऊ वाघंबर,ज्ञानदीप चे संचालक उध्दवराव ईप्पर आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
पुढे बोलताना आयपीएस अधिकारी शहाजी उमाप म्हणाले की,सोशल मिडीयाचे प्राबल्य पहाता प्रिंट मिडियाचे भविष्यामध्ये काय होईल याची या क्षेत्रातील दिग्गजांकडून भीती व्यक्त होत असल्याचे सांगीतले.
या प्रसंगी माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगीतले की, पत्रकारिता हे सतीचे वाण असुन धैय्याने प्रेरित अशी पत्रकारीता होणे गरजेचे आहे.तसेच आज पर्यंत जो विकास झाला आहे या मध्ये येथील पत्रकारांचा सुध्दा मोठा वाट असून या मतदार संघांच्या विकासासाठी रेल्वे लाईन आली पाहीजे यासाठी सामुहिक प्रयत्न चालू असुन याही कामात पत्रकारांनी आपले योगदान द्यावे अशी अपेक्षा केली.
या वेळेस जेष्ठ संपादक माणिक मूंढे यांना ‘दर्पण सेवा गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.तर जेष्ठ पत्रकार चंद्रकांत शिंदे व साकरप्पा वाघमारे यांना ‘दर्पण जीवन गौरव’ पुरस्कार देवून विशेष पोलीस महानिरिक्षक नांदेड परिक्षेत्राचे शहाजी उमाप यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या प्रसंगी सत्कार मूर्ती जेष्ठ पत्रकार- संपादक माणिक मूंडे यांनी बोलताना म्हणाले की, माध्यमा मध्ये दैनंदिन बदल झपाट्याने होत आहेत.त्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांनी स्वतःला माहिती तंत्रज्ञानाने स्वतःला अपडेट ठेवावे असे प्रतिपादन केले.तसेच स्वतःच्या आरोग्या कडे सुध्दा बारकाईने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संयोजक तथा साहित्य संगीत कला अकादमी चे अध्यक्ष डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक करताना म्हणाले की,गेल्या 19 वर्षापासून हा उपक्रम चालू असुन ग्रामीण भागातील पत्रकारांना राज्यस्तरावरील दिग्गज नामवंत पत्रकार संपादकांकडून मार्गदर्शन मिळावे हा आपला हेतू असुन वर्षभर समाजहितासाठी झगडणार्या पत्रकारांचा सन्मान व्हावा या हेतूने कार्यक्रम आयोजित केले जातात. भविष्यात याहून दर्जेदार कार्यक्रम घेण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रा.मारोती बुद्रूक पाटील यांनी केले.तर आभार प्रदर्शन पत्रकार विलास चापोलीकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गफारखॉन पठाण,अजय भालेराव,सचिन बानाटे, आकाश सांगवीकर, आकाश पवार, सय्यद तरबेज, मोहम्मद पठाण, प्रशांत जाभाडे, भिमराव कांबळे, गणेश मुंढे,संविधान कदम,दिनेश तिगोटे, शिवाजी भालेराव आदींनी पुढाकार घेतला.
यावेळी अहमदपूर व चाकूर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *