यशवंत विद्यालयात दर्पण दिन उत्सव उत्साहात साजरा
अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील यशवंत विद्यालयात दर्पण दिन उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. प्रारंभी प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी राम तत्तापुरे यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी आरशाप्रमाणे आपले जीवन जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर घडवावे असे सांगितले. सूत्रसंचालन के डी बिराजदार यांनी तर आभार श्रीधर लोहारे यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.