अहिल्या नगर सायक्लोथॉनमध्ये पहिल्या दहात अहमदपूरचे चार जण, शंभर किमी अंतर केले पार
अहमदपूर (गोविंद काळे) : अहिल्यानगर येथे 5 जाने 2025 रोजी आयोजित नगर सायक्लोथॉन स्पर्धेत अहमदपूर रनर्स व सायकलिंग ग्रुपच्या 4 रायडर्स नी आपला दबदबा राखत दमदार कामगिरी केली. आरोग्य हीच संपत्ती हे ओळखून अहमदपूर शहरात अहमदपूर रनर्स व सायकलिंग ग्रुप कार्य करत आहे.
याचाच भाग म्हणून अनेक मॅरेथॉन मध्ये ग्रुपचे सदस्य सहभागी होत आहेत. सायकलीचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर येथे आयोजित भारतातील सर्वात मोठ्या सायक्लोथॉन सिझन 6 मध्ये अहमदपूर सायकलिंग ग्रुपच्या नवनाथ हांडे यांनी 4:05तास ,कृष्णा काळे 4:11तास ,भरत इगे 4:28तास आणि सूर्या साकोळे 4:32 तास अशाप्रकारे या 4 जणांनी 100KM स्पर्धेत सहभागी होऊन सर्वानी आपली सर्वोत्तम कामगिरी करत ग्रुपचे नाव केले. या इव्हेंटमध्ये देशभरातील 2000 सायकलपटूंनी सहभाग घेतला.अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड या ठिकाणी अहमदनगर सायलकिंग क्लब, इंडियन आर्मि आणि फिट इंडिया यांच्या वतीने 5,10,25,50 व 100 अशा 5 प्रकारात स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचा कोणताही अनुभव नसताना तसेच साधारण सायकली असताना सराव व इच्छा शक्तीच्या बळावर केलेल्या कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत.