भारतीय जनता युवा मोर्चा अहमदपूरच्या वतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात संपन्न झाले
अहमदपूर (गोविंद काळे) : युवा मोर्चाच्या वतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियान 2024 दि .07 जानेवारी 2025 रोजी राबविण्यात आले यावेळी अभियानाचे रिबीन कापून उद्घाटन अहमदपूर विधानसभा प्रभारी ऊचेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष लातूर दिलीपराव देशमुख भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस भारतभाऊ चामे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोलभैया निडवदे भाजपा ज्येष्ठ नेते राजकुमारभाऊ मजगे, तालुकाअध्यक्ष प्रताप पाटील,भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामानंद मुंडे,शहराध्यक्ष सुशांत गुणांले, जिल्हा सरचिटणीस प्रणिता बेंबडे,संयोजक विजयकुमार देशपांडे, ओबीसी तालुका उपाध्यक्ष गंगाधर सुर्यवंशी,मिलींद तेलंगे,अमर पाटील, रविशंकर स्वामी,नरेंद्र जोशी या वेळी युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व भाजपा सदस्य नोंदणी अभियान मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले.