महात्मा फुले महाविद्यालयाचा मुलीचा संघ रस्सीखेच स्पर्धेत द्वितीय
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन रस्सीखेच स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मुक्रमाबाद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन रस्सीकेच स्पर्धेत महात्मा फुले महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने सर्वद्वितीय क्रमांक मिळविला असून या संघामध्ये कर्णधार दुर्गा पटवारी,दिव्या गुळवे, अंकिता जाधव, ऐश्वर्या बोडके, ज्योत्स्ना मचकंटे, सानिया पठाण, सोनाली गायकवाड, वैष्णवी नागरगोजे, अश्विनी फड, शिवकन्या पुट्टेवाड, श्वेता तिगोटे कोमल कनकदंडे या खेळाडू विद्यार्थिनींचा समावेश होता. या यशस्वी खेळाडूंचे तसेच मार्गदर्शक तथा क्रीडा संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सचिव पी. टी. शिंदे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्या सह सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.