सिद्धी शुगर च्या सभासदांना मोफत युरिया खताचे वाटप.

0
सिद्धी शुगर च्या सभासदांना मोफत युरिया खताचे वाटप.

सिद्धी शुगर च्या सभासदांना मोफत युरिया खताचे वाटप.

अहमदपूर (गोविंद काळे) : सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड उजना या साखर कारखान्यामार्फत सभासदांना मोफत एरिया खताचे वाटप करण्याचा शुभारंभ दिनांक सात जानेवारी 2025 रोजी कारखान्याचे मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेब जी जाधव साहेब माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते राधा कृष्ण कृषी सेवा केंद्र अहमदपूर येथे करण्यात आला.
सिद्धी शुगर कारखान्याच्या माननीय व्यवस्थापनाने माहे ऑगस्ट 2024 मध्ये पूर्व हंगामी ऊस लागवड योजना जाहीर केली होती. सदर योजनेमध्ये माहे ऑक्टोबर 2024 अखेर ऊस लागवड करणाऱ्या ऊस उत्पादक सभासदांना दोन हेक्टर पर्यंत ऊस लागवड केल्यास मोफत दहा ब्याग युरिया खताचे वाटप करण्याचे धोरण ठरविले होते. सदर योजनेला प्रचंड प्रतिसाद देऊन ऊस उत्पादक सभासदांचा माहे ऑक्टोबर 2024 अखेर अकराशे हेक्टर ऊस लागवड करण्याचा उच्चांक केला असून सदर योजनेत सहभाग नोंदविलेल्या सभासदांना राधाकृष्ण कृषी सेवा केंद्र अहमदपूर येथून कारखान्याचे मार्गदर्शक माननीय श्री बाळासाहेब जी जाधव साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते तालुक्यातील थोडगा माळेगाव टेंभुर्णी मर्शिवनी सिंदगी खुर्द तांबट सांगवी स्वरा लांजी आदी गावातील तसेच सिद्धी शुगर कारखान्याच्या विविध भागातील टाकळगाव रोकडा सावरगाव शिरूर ताजबंद चाकूर जांब गंगाखेड नांदुरा खुर्द इत्यादी ठिकाणी सभासदांना युरिया खताचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी सिद्धी शुगर कारखान्याचे व्हाईस प्रेसिडेंट श्री पी जे होनराव साहेब तालुका कृषी अधिकारी श्री सचिन बागवे जनरल मॅनेजर कॅन श्री मिटकर साहेब ऊस विकास अधिकारी श्री टाळे साहेब शिवाजी पाटील यस्तार चे सरपंच पांडुरंग ढाकणे मधुकर महाराज तरडे आदी सह शेतकरी सभासद व सर्व ऊस विकास विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *