महात्मा फुले महाविद्यालयात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी नामदेवराव चामले यांना श्रद्धांजली
अहमदपूर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे संस्थापक सदस्य नामदेवराव रामराव चामले मामा यांचे मुंबई येथे वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांना अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शोकसभेत ज्येष्ठ स्वतंत्र्य सेनानी तथा किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य नामदेवराव चामले मामा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कै. नामदेवराव चामले मामा यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी मौजे आरसनाळ ता. उदगीर जिल्हा लातूर येथे दि. ११ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ः३० वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.