प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरच्या वतीने लहान बालकांना उबदार चादर (बेबी शॉल) वाटप

0
प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरच्या वतीने लहान बालकांना उबदार चादर (बेबी शॉल) वाटप

प्रभुराज प्रतिष्ठाण लातूरच्या वतीने लहान बालकांना उबदार चादर (बेबी शॉल) वाटप

लातूर : माता रमाबाई आंबेडकर रुग्णालय महिला प्रसूती गृह विभाग,लेबर कॉलनी,लातूर परिसरात लहान बालकांना प्रभुराज प्रतिष्ठाण,लातूर च्या वतीने ४० बालकांना उबदार चादर(बेबी शॉल) वाटप तसेच अनेक वर्षांपासून हिवाळ्यात कष्टकरी परिवारांच्या बालकांना उबदार चादर (बेबी शॉल ) वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला तसेच सध्या कडाक्याची थंडी वाजत असल्याने प्रत्येकजण थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे परिधान करतात त्याच परिस्थिती लातूर शहरात मोठे रुग्णालयात इलाज करण्यासाठी मध्यमवर्गीय परिवाराला परवडत नसल्याने कष्टकरी जनता व महिला इलाज करण्यासाठी सरकारी शासकीय रुग्णालायात दाखल होऊन बाळाला जन्म देतात. आणि थंडीच्या हिवाळी मोसमात लहान बालकांना थंडी वाजू नये आणि त्यांची प्रकृती चांगली असावी थंडी पासून बचाव करण्यासाठी त्या बालकांना उबदार चादर (बेबी शॉल ) जिल्हा विधीसेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश पी.पी. केस्तीकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. थंडीपासून बचाव व थंडीचा सामना करण्यासाठी प्रभुराज प्रतिष्ठाणने पुढाकार घेत लहान बालकांना उबदार चादर (बेबी शॉल ) त्यांच्या अंगावर मायेची उब चादर पांगरून सामाजिक उपक्रम रबविण्यात आला.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथा न्यायाधीश पी.पी.केस्तिकर,प्रभुराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड.अजय कलशेट्टी,वैधकीय स्त्री रुग्णालय चे अधीक्षक डॉ. रवींद्र भालेराव, वैधकीय अधिकारी मनपा डॉ. रमेश बागडे, अँड.सुरेश सलगरे,अँड.किरण चिंते, अँड.कल्पना भुरे,अँड.सविता मोतीपवळे,वाय. एस.मशायक,पारस चापासी, डॉ.श्रीराम कोळेकर,सखाराम बरचे,शिरीष माळी, डॉ. सोनाली केंद्रे, डॉ. क्रांती कापसे मॅटरनल पल्लवी चव्हाण, अजय श्रीमांगले,नामदेव गायकवाड, रुग्णलयाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *