अपयशाने खचून न जाता शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे – शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी
उदगीर (एल.पी.उगीले) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त,जिल्हा परिषद, पंचायतसमिती,नगरपालिका निवडणूक निमित्त आढावा आणि मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी मार्गदर्शक म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी उपस्थित होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
यावेळी रेड्डी म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फक्त 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत असते. त्यामुळे शिवसैनिक पदाधिकारी यांनी खचून न जाता, यश अपयशी येत असते , जात असते. अपयश हीच यशाची पायरी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त पूर्ण शहरांमध्ये, तालुक्यात गाव पातळीवर जयंती ही रक्तदान शिबिर, अन्नदान , नेत्रदान शिबिर राबवून साजरी करावी. तसेच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश खेचून आणण्यासाठी सर्वांनी एक दिल्याने काम करावे. त्यामुळे सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे. असे मत बालाजी रेड्डी आणि व्यक्त केले. यावेळी उपस्थित उपजिल्हाप्रमुख अंकुश कोणाळे,तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल,शहरप्रमुख अनिल पंचाक्षरी, शिवसेना नेते श्रीमंत दादा सोनाळे,जिल्हा समनवयक प्रकाशजी हैबतपुरे,महिला आघाडी नेत्या आरुणाताई लेंडाणे, एस.टी.कामगार सेना जिल्हा कोषाध्यक्ष महेश पोलकर, युवासेना जिल्हा समन्वयक शैलेश वडगावे, सरचिटणीस रमण माने,उपजिल्हा युवाधिकारी उपेंद्र काळेगोरे, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले,युवा तालुका अधिकारी चंद्रकांत सांगळे,गोविंद मामा बेंबडे, मुन्ना पांचाळ,व्यंकट साबणे, उपतालुकाप्रमुख ऍड रामदास काकडे,मनोज पाटील,महेश फुले,ऍड शरद पाटील,लक्ष्मीकांत गुडमेवार, संजय मठपती, बालाजी मिसळवाड,एस टी कामगार सेनेचे दयानंद फड,धनराज स्वामी, बापूराव कदम,परशुराम इभूते,संगम मेहत्रे,बाळू विभुते, ओमकार सूर्यवंशी,किरण कांबळे, वीरेंद्र स्वामी,अमोल बिरादार,मुकुंद जाधव,बालाजी हंडीखेरे, महिला आघाडी च्या सरोजा बिरादार,वैशाली गोटमुकले, सुनीता फुलारी, ललिता गंगणे,ज्योती गायकवाड, श्वेता उळे,लक्ष्मीबाई कांबळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.वरिष्ठ नेत्याचे मार्गदर्शन आणि पक्ष बांधणीसाठी सखोल चर्चा झाली.
यावेळी मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील कै. सोमनाथ सूर्यवंशी यांना उदगीर शिवसेनेच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.