मोटार सायकल व चारचाकी कारची समोरा समोर जोराची धडक ; दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरापासुन जवळच असलेल्या थोडगा रोड वरील नॅशनल हायवेवरील बायपास बाह्य वळण रस्त्यावर मोटार सायकल व चार चाकी कारची दि ११ जाने रोजी सायंकाळी ०४ : ४५ वाजता समोरा समोर धडक होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु झाला असुन पत्नी गंभीर जखमी झाली असल्यामुळे लातुर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी हडोळी ( बृ ) ता कंधार जि नांदेड येथील दोघे पती पत्नी अहमदपूर येथे काही कामानिमित्त आले असता आपले काम संपवुन मोटार सायकल वरून परत गावाकडे अहमदपूर शहरापासुन जवळच असलेल्या थोडगा रोड वरील नॅशनल हायवे वरील बाय पास बाह्य वळण रस्त्यावरून हायवे रस्त्यावर दुचाकी हिरो कंपनीची स्पेंडर एम.एच २६ बि. यु ५९ ५२ वरून पत्नीला घेऊन जात असताना लातुरहुन नांदेड कडे भरधाव वेगाने जाणारी किया कंपनीची चारचाकी कार एम.एच २६ सि. सि ८१०० ची दि ११ जाने रोजी सायंकाळी ०४.४५ वाजता समोरा समोर जोराची धकड होऊन मोटार सायकल वरील सुखाचार्य नारायण गुट्टे वय ५९ रा हडोळी ता कंधार जि नांदेड यांचा जागीच मृत्यु झाला असुन त्यांची पत्नी दिनाबाई सुखाचार्य गुट्टे वय ५७ रा हडोळी ता कंधार जि नांदेड या गंभीर जखमी असुन त्यांना पुढील उपचारासाठी लातुर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.