अहमदपुरात आज तिसऱ्या एक दिवसीय ‘जागल’ साहित्य संमेलनाचे आयोजन !
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरच्या वतीने तिसऱ्या ‘जागल’ साहित्य संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्या दि १२जानेवारी २५ रोजी होणार आहे.
याबाबतचे सविस्तर होत असे की, मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूर द्वारा आयोजित तिसऱ्या जागल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लोकसाहित्याचे अभ्यासक व माजी प्राचार्य डॉ. धोंडीराम वाडकर हे असून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे उद्घाटक तथा सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या संमेलना दरम्यान नामदार बाबासाहेब पाटील यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहकार मंत्री म्हणून वर्णी लागल्याबद्दल तसेच मराठवाडा साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचा मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन राम तत्तापुरे व आशाताई रोडगे तत्तापुरे हे करणार आहेत.
या साहित्य संमेलन अंतर्गत दुपारच्या सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आला असून ‘मला आवडलेले पुस्तक ‘यावर परिसंवाद सत्राचे अध्यक्ष महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार हे असून या परिसंवादात प्राचार्य नीळकंठ पाटील, प्रा. डॉ. नानासाहेब सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार उदयकुमार जोशी व डॉ. वैभव रेड्डी यांचा सहभाग नोंदवणार आहेत. तर सूत्रसंचालन जिलानी शेख हे करणार आहेत.या साहित्य संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात कवीसंमेलन आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी कवयित्री सौ. मीना तोवर ह्या आहेत. तर कामाक्षी पवार, सय्यद शाहिदा बेगम, सुनंदा कुलकर्णी, बालाजी मुंडे, प्रा. अनिल चवळे, महेंद्र खंडागळे, भागवत येणगे, दीपक बेले या व इतर मान्यवर कवींचा समावेश राहणार आहे.कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री वर्षा माळी लगडे ह्या करणार आहेत.
तसेच या साहित्य संमेलनाचा समारोप दि. १२ जानेवारी २०२५ रविवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला असून या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरचे अध्यक्ष सत्यनारायणभाऊ काळे हे असून यावेळी संमेलनाध्यक्ष माजी प्राचार्य डॉ.धोंडीराम वाडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. समारोप सत्राचे सूत्रसंचालन प्राचार्य दिलीप मुगळे हे करणार आहेत.
‘जागल ‘ या तिसऱ्या साहित्य संमेलनास संस्कृती मंगल कार्यालय येथे ९ते सायंकाळी ५या दरम्यान रसिकांनी तसेच मराठी साहित्य व भाषेवर प्रेम करणाऱ्या जाणकारांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरचे अध्यक्ष सत्यनारायणभाऊ काळे, कार्यवाह हरिदास तमेवार, उपाध्यक्ष उदयकुमार जोशी, कोषाध्यक्ष महेंद्र खंडागळे , सहकार्यवाह शेख जिलानी, प्रसिद्ध लेखक मोहिब कादरी यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.