श्री संत अंबाजी महाराज सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने बहि:शाल व्याख्यानमालेचे आयोजन
किनगाव (गोविंद काळे) : महाविद्यालयीन प्राध्यापकांनी आपले ज्ञान व विचार चार भिंती पुरते मर्यादित न ठेवता त्यांनी गाव तांडे वाड्या वस्ती वर जाऊन प्रबोधन केले पाहिजे. महाराष्ट्राला प्रबोधनाची मोठी परंपरा आहे संत साहित्यिक आणि समाजसुधारकांनी आपले जीवन यासाठी खर्ची घातली आहे त्यांच्या विचाराचा वारसा पुढे चालविण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने शाळा महाविद्यालया बरोबरच वाचनालय, सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून बहि:शाल व्याख्यानाचे आयोजन केले जाते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व हिंगणगाव येथील श्री संत अंबाजी महाराज सार्वजनिक वाचनालय हिंगणगावच्या वतीने श्री संत भगवान बाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता हनुमान मंदिर हिंगणगाव या ठिकाणी प्राध्यापक मनोहर जायेभाये यांचे राष्ट्रसंत भगवानबाबा यांचा विवेकी वारसा या विषयावरील व्याख्यानाचा लाभ हिंगणगाव व परिसरातील ग्रामस्थ बंधू भगिनींनी घ्यावा असे आवाहन श्री संत अंबाजी महाराज सार्वजनिक वाचनालय हिंगणगाव चे सचिव भरत राख, अध्यक्ष प्राचार्य डॉ विठ्ठलराव घुले व ग्रंथपाल नवनाथ बाबुराव घुले सरपंच सौ सुरेखा सुभाषराव घुले उपसरपंच सौ वेणुबाई दत्ता फड व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.