जयहिंद प्रयाग प्राथमिक व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : जयहिंद प्रयाग प्राथमिक व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवराजजी माने उद्घाटन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. दत्ताभाऊ गलाले(शिव छत्रपती पुरस्कार विजेते), उदय जी गुंडले, पत्रकार आदर्श न्यूज .यांची उपस्थिती होती .
तसेच या शोभायात्रेचे जिजाऊ चौक मेन रोड अहमदपुर येथे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्रशांत भोसले,दत्ता गलाले सर,भोसले सर आदि उपस्थित होते.या शोभायात्रेचे शहरात ठिकठीकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. पाटील गल्लीत सर्व मित्रपरीवाराने शोभायात्रेतील मुलांसाठी अल्पोपआहाराची व्यवस्था केली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटना वेळी मनोगत व्यक्त करताना शाळेच्या या उपक्रमाचे तोंडभरुन कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाखात जिजाऊ जयंती साजरी केली. राजमाता जिजाऊ व छत्रपती बाल शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा लसाकारून जिजाऊंनी शिवबाला कसे घडवले यांची प्रेक्षकांसमोर सादरीकरण केले. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आदर्श महिला सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, इंदिरा गांधी, प्रतिभाताई पाटील ,फातिमा शेख, तसेच स्वामी विवेकानंद यांचा विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करून देखावा निर्माण केला. . तसेच शाळेतून बँक कॉलनी, जिजाऊ चौक, बसवेश्वर चौक, आंबेडकर चौक, पाटील गल्ली, मारवाडी गल्ली , पंचशील नगर अहमदपूर मार्गे रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सर्वात पुढे
राजमाता जिजाऊ घोड्यावर बसून त्यांच्या बाजूला मावळे उभा करण्यात आले होते. त्याच्या पाठीमागे शाळेच्या विद्यार्थ्यांचे ढोल ताशा पथक सह लेझीम पथक, मुलींची टिपरी पथक ,व सर्व शाळेतील विद्यार्थी या रॅलीमध्ये उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.