महात्मा फुले महाविद्यालयात शामराव मोरे यांना श्रद्धांजली
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रोफेसर डॉ. अभिजीत मोरे यांचे वडील कै. शामराव संतराम मोरे यांचे नांदेड येथे दि. ११ जानेवारी २०२५ रोजी रात्री दहा वाजता वयाच्या ८२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांना महात्मा फुले महाविद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याबाबतचे सविस्तर होत असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत उच्चशिक्षित असलेल्या कै. शामराव मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शामराव मोरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार क्षेत्रामध्ये प्रदीर्घकाळ सेवा करून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. या शोकसभेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.