पोलीस पाटील संघटनेच्या लातूर जिल्हा अध्यक्ष पदी भालचंद्र शेळके पाटील
लातूर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र राज्य गावाकमगार पोलीस पाटील संघटनेच्या शिर्डी येथे महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटील यांचे राज्यस्तरीत शिबीर आयोजित करण्यात आले . या शिबिरात लातूर जिल्हा अध्यक्षपदी उदगीर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले डोंगरशेळकी या गावचे आदर्श पोलीस पाटील भालचंद्र शेळके पाटील यांचा सन्मान करून त्यांना पदोन्नती देण्यात आली. गेले दहा वर्षापासून उदगीर तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र सोपानराव शेळके पाटील यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली असून सर्वांशी मिळून मिसळून राहण्यात आणि एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांचा मोठा सहभाग असतो. त्यांच्या या संघटनात्मक गुणाचा सर्वांना फायदा व्हावा या हेतूने त्यांची पदोन्नती करत त्यांची लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड केली आहे.
भालचंद्र शेळके पाटील यांना त्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल महसूल विभागाचा उपविभागीय स्तरावरचा आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. या वर्षी सण 2024 चा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल महसूल दिनी प्रशस्ती पत्र व ट्रॉफी देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
भालचंद्र शेळके पाटील हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत, ते सतत गोरगरिबांना मदत करण्यात धन्यता मानतात. सामाजिक कार्य असो की, गोरगरिबांच्या मदतीसाठी धावून जाणे असो ते सतत पुढाकार घेऊन पुढे असतात. त्यांच्या या सामाजिक जाणीव जपण्याच्या कामामुळे आणि लोकांच्या सुखदुःखात पुढाकार घेऊन मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.
या निवडीबद्दल पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच पोलीस पाटील संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त आदर्श पोलीस पाटील भाऊसाहेब सपाटे पाटील व राज्य कार्यकारिणचे सर्व सदस्य तसेच
महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांनी त्यांच्या अभिनंदन करून कौतुक केले आहे. सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदन असा होत आहे.