पर्यावरण टिकले तरच मानव टिकेल – गोविंद रावळे
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात भूगोल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रमुख वक्ते गोविंद रावळे म्हणाले की, मानवाला जगण्याचा मार्ग हा पर्यावरणातून मिळतो, पण मानवाने आपल्या हव्यासापोटी जंगले नष्ट केली, नद्या नष्ट केल्या, त्यामुळे आरोग्य धोक्यात आले . पण भूगोल जगले तरच मानव जगेल. त्यामुळे हवा, पाणी, जमीन या सर्वांची काळजी घ्या.
भूगोल दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे , तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्लता बोडके यांची उपस्थिती होती. यावेळी ज्ञानोबा कुंडगिरे यांनी ग्रहणाबद्दल माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, ग्रहण ही भौगोलिक घटना असून याबद्दल कोणीही अंधश्रद्धा बाळगू नये.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित बिराजदार यांनी केले.सूत्रसंचालन वर्षाताई पाटील यांनी केले तर आभार शशीकुमार पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल नादरगे, प्रशांत पांचाळ, मनोरमा तेलंगे यांनी परिश्रम घेतले.