सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना.श्री प्रकाश आबिटकर यांची माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी घेतली भेट लातूर जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य सुविधांच्या मागण्या बाबत आरोग्य मंत्री अनुकुल
लातूर (प्रतिनिधी) : १४ जानेवारी २५ लातूर जिल्हा रुग्णालयाची उभारणी, त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधीची तरतूद करणे, यासह लातूर शहर व जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना. श्री प्रकाश आबिटकर यांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मुंबई येथे भेट घेऊन दिले. लातूर जिल्ह्यातील विविध आरोग्य संबंधित समस्या आणि त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या मागण्याबाबत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना. श्री प्रकाश आबिटकर यांची मंगळवार दि. १४ जानेवारी २५ रोजी मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत उभयतामध्ये लातूर जिल्हा रुग्णालयाची उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधीची तरतूद करणे, यासह लातूर शहर व जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा झाली.
लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती लातूर येथे मंजूर असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयाचे बांधकाम अनेक वर्षापासून जागेअभावी प्रलंबित होते, या रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची १० एकर जागा व बांधकामासाठी प्राथमिक आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र सदरील जागेचा मोबदला न दिला गेल्यामुळे जागेचे हस्तांतरण होऊन बांधकाम सुरू होऊ शकलेले नाही, ही बाब लक्षात घेता कृषी महाविद्यालयास जागेचा मोबदला म्हणून शासकीय नियमानुसार द्यावयाचा ३ कोटी ६८ लाख रुपयाचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी केली, लवकरच सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात सदरील निधीची तरतूद करून तो कृषी महाविद्यालयाकडे वर्ग केला जाईल असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले. जिल्हा रुग्णालयाची उभारणी त्याचबरोबर त्या परिसरात इतर सोयी सुविधा उभारणीबाबतही यावेळी चर्चा झाली. खाजगी रुग्णालयांच्या मागण्यांचाही विचार लातूर शहर आरोग्य सेवेचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. या परिस्थितीत या शहरातील खाजगी रुग्णालयांच्या वतीने इंडियन मेडिकल असोसिएशनने काही मागण्या शासनाकडे सादर केल्या आहेत त्यास मंजुरी द्यावी अशी विनंती ही याप्रसंगी त्यांच्याकडे केली. खाजगी रुग्णालय परवान्याचे नूतनीकरण दर ३ वर्षा ऐवजी ते दर ५ वर्षांनी करावे, खाजगी हॉस्पिटल मधील मनुष्यबळ नियुक्तीच्या नियमात काही अंशी शिथिलता आणावी यासह आयएमए ने केलेल्या इतर काही मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत त्यावर विचार करून त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी विनंती याप्रसंगी केली. आरोग्यमंत्र्यांसोबतची ही भेट सकारात्मक एकंदरीत सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांसोबतची ही भेट सकारात्मक वातावरणात पार पडली. यावेळी त्यांच्याकडे सादर केलेल्या सर्व मागण्या सार्वजनिक हिताच्या आहेत त्यामुळे त्यावर त्वरित अनुकूल निर्णय घेण्यात येईल, लातूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू होईल या दृष्टीने प्रयत्न केले जातील याप्रसंगी अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना. श्री प्रकाश आबिटकर यांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना दिली. या भेटीमुळे लातूर जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्याची अपेक्षा वाढली आहे. लवकरच लातूर जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होईल आणि जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावेल, अशी अपेक्षा
व्यक्त करण्यात येत आहे.