संक्रांतीच्या निमित्ताने जिव्हाळा ग्रुपच्या वतीने जिव्हाळा जपण्याचा प्रयत्न
उदगीर (एल.पी.उगीले) : निडेबन येथील पंचशील चौकात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीरचे उपाध्यक्ष विश्वनाथ मुडपे यांच्या पुढाकाराने मकर संक्रांति निमित्त जिव्हाळा ग्रुपने समाजामध्ये गोडवा निर्माण व्हावा या उद्देशाने कार्यक्रम घेतला. चौकात जमलेल्या रिक्षा चालक बांधवांना तिळगुळ दिल्यानंतर विश्वनाथराव मुडपे यांनी मकर संक्रांतीचे महत्त्व सांगून त्या काळात होणाऱ्या पर्यावरणातील बदला संदर्भातही सविस्तर माहिती सांगितली, तसेच भौगोलिक, वैज्ञानिक, आरोग्य विषयक महत्त्व सांगितले. जीवन जगताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून, बंधुतेने,व्यसनमुक्त व तंटामुक्त राहण्याचा संदेश दिला. तिळगुळाची गोडी, माणुसकी जोडी.
जिव्हाळा ग्रुप उदगीर तर्फे योग गुरु शिवमुर्तीआप्पा भातंबरे यांच्या अध्यक्षतेखाली जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष रमाकांत बनशेळकीकर यानी
मकर संक्रांतीचे सांस्कृतिक व भौगोलिक माहिती दिली. माणिक चौकातील हॉटेल ग्रुप कृपा वर झालेल्या स्नेह मेळाव्यात विश्वनाथ मुडपे, मृद सन्धारण विभागातून सेवानिवृत्त झालेले विठ्ठलराव फुलसे,
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक रमाकांत मध्वरे, सहयोग बँकेचे संचालक रामराव मोमले,
सेवानिवृत्त सैनिक हरिश्चंद्र वट्टमवार, अमृतराव देशपांडे सोपानराव माने, शंकरराव केंद्रे, शंकरराव साबणे, संजय कानगुले,शरणप्पा खेळगे, सुभाष तगाळे, वैजनाथ पंचगल्ले
इत्यादी मान्यवर उपस्थित होते.