राष्ट्रीय सेवा योजना हा नवराष्ट्र निर्मितीचा विचार : प्रा. डॉ. नारायण कांबळे
उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यावर समाजसेवेचे संस्कार करणारी एक महत्त्वपूर्ण योजना असून ती स्वावलंबी जीवन जगण्याचा मार्ग दाखवते, तसेच श्रमातून स्वावलंबी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करते. राष्ट्रीय सेवा योजना ही समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना हा नवराष्ट्र निर्मितीचा विचार आहे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष तथा विद्या परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. नारायण कांबळे यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मोजे सताळा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थासचिव रामचंद्र तिरुके, सदस्य अँड. प्रकाश तोंडारे, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. केशवराव अलगुले, सरपंच सौ. कुसुमबाई वाघम्बर तिरकोळे, उपसरपंच सचिन सुडे, मुख्याध्यापक एस. जी.मळभागे,
ग्रामसेवक लोणीकर,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सिद्धेश्वर धाराशिवे, माजी सरपंच शिवलिंग आप्पा जळकोटे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जळकोटे, माणिक मदने, आयोध्या प्रशांत नरहारे, सुकुमार नर्सिंग बालने, अनिता मोतीराम बोने, विमलबाई जनार्धन कांबळे, रुक्मिणी नागनाथ सताळकर, गुणवंत बिर्गे, अनुसया बाबुराव मद्दे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी सताळा बु., व सर्व शिक्षक, राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक माळगे व सर्व शिक्षक, गावातील वाघम्बर तिरकुळे, प्रशांत नरहारे, गणेश मदने, बंडू तिरकुळे, सत्यवान मदने व ग्रामस्थ यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. कांबळे म्हणाले की, समाज परिवर्तनाचा एक क्रांतिकारी प्रयोग या माध्यमातून करणे शक्य आहे. ग्रामविकासात विद्यार्थ्यांचा सहभाग ही संकल्पना तशी आशयगर्भ व नाविन्यपूर्ण आहे. विद्यार्थ्यांच्या विधायक शक्तीचा विकास हाच मुळात अशा विकास कार्यातून होणार असतो. विद्यार्थ्यांच्या मनात श्रमप्रतिष्ठा रुजवावी, अहंकारापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करावे आणि श्रमाधिष्ठित विधायक कामाची आवड निर्माण करावी, ही उद्दिष्टे या राष्ट्रीय सेवा योजनेचे आहेत. उच्च शिक्षणात “कार्यनीती” जोपासणारी ही राष्ट्रीय सेवा योजना आहे. केवळ सत्ता, संपत्ती व स्वार्थाच्या मागे धावणाऱ्या आजच्या समाजातील युवकांना त्यागाचे, सेवेचे पाठ देणाऱ्या या योजनेचे सामाजिक क्षेत्रात एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपस्थितांना केले. रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. केशव आलगुले म्हणाले, रासेयो स्वयंसेवकांनी शिबिरातून शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्यावा. संस्था सचिव रामचंद्र तिरुके म्हणाले, विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्यासाठी अशा शिबिराचे महत्त्व आहे. आपले घर सोडून ग्रामीण भागात लोक कशा पद्धतीने राहतात, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याकरिता असे शिबिरे वारंवार झाले पाहिजेत. अध्यक्षीय समारोप करताना संस्था अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी म्हणाले, श्रमाधिष्ठित समाज निर्मितीसाठी रासेयो शिबिर महत्वपूर्ण आहे. महाविद्यालय व गाव यांना जोडण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून केले जात असते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी होकरणे यांनी तर आभार प्रा. डॉ. सुनंदा भद्रशेट्टे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. एन. डी. वगशेटे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी आणि शिक्षक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.