रोटरी क्लबच्या वतीने श्री गुरू हावगीस्वामी यात्रेनिमित्त आरोग्य शिबीर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथे श्री गुरू हावगीस्वामी महाराज यांची यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व श्री बाल रुग्णालय व क्लिनिक यांच्या वतीने श्री हावगीस्वामी मठ संस्थान येथे मोफत बाल रोग व स्त्री रोग निदान शिबीर घेण्यात आले.
यावेळी शिबीराचे उद्घाटन मठाचे मठाधिश श्री श्री डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. या शिबीरात २५० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबीरात डॉ. विश्वनाथ डांगे, डॉ. बस्वराज स्वामी, डॉ. मृत्युंजय वंगे, डॉ. संदीप मुसने, डॉ. स्मृती स्वामी, डॉ. नेहा मुसने, प्रीतम डांगे, विनोद पाटील, गौरव थोटे यांनी रुग्णांना सेवा दिली. याप्रसंगी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, सचिव ज्योती चौधरी, संतोष फुलारी, प्रमोद शेटकार, विशाल तोंडचीरकर, मंगला विश्वनाथे, सुनीता चवळे, अनिल मुळे आदींची उपस्थिती होती.