कु. वैष्णवी श्रीकांत पाटील हिचा भव्य सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : युवक व क्रीडा मञांलय भारत सरकार द्वारे आयोजित केलेल्या विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संपुर्ण भारत देशातुन 30 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यात भारतमडंपम दिल्ली येथे बहुस्तरीय निवड प्रक्रियेद्वारे भारत देशातुन निवडलेल्या 3000 विद्यार्थ्यांमध्ये कु. वैष्णवी श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल अडत व्यापारी वेलफेअर असोशिएशन, कृषी उत्पन बाजार समिती उदगीरच्या वतीने जि.प. मैदान येथे भव्य सत्कार करण्यात आला. तसेच सर्व मित्रपरिवार यांच्यावतीने तिचा सत्कार करुण कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.