महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त जनजागृती
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के होते. उपप्राचार्य एस. जी. कोडचे, मोटरवाहन निरीक्षक सुनील खंडागळे, मोटर वाहन निरीक्षक मंगेश गवारे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल सोमदे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अक्षय पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक अमोल सोमदे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा संबंधीची शपथ दिली. यावेळी बोलताना सुनील खंडागळे म्हणाले 90 टक्के अपघात हे मानवी निष्काळजी आणि चुकांमुळे होतात. याची जाणीव जागृती करण्यासाठी हे अभियान आहे, दुचाकी वर प्रवास करताना हेल्मेट, चार चाकी वाहनातून जाताना सीट बेल्ट लावलाच पाहिजे. योग्य प्रमाणात वाहनाची गती असावी, तणावाने वाहन चालवू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, विनाकारण हॉर्न वापरू नये. यावेळी जाणीव जागृतीच्या पत्रकाचे वाटप करण्यात आले. समारोपात डॉ. मस्के म्हणाले सजग राहिल्यास अपघात घडत नाही वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालवले पाहिजे. सूत्रसंचालन प्रा. सचिन कांबळे यांनी केले तर आभार प्रा. प्रवीण जाहुरे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील, पर्यवेक्षक प्रा. एस .व्ही. मुडपे, प्रा.जी. एस. पाटील यांच्यासह प्राध्यापक तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.