मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा सत्कार

0
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा सत्कार

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा सत्कार

उदगीर(एल.पी.उगीले) येथील मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने सोमवार दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी दुपारी चार वाजता उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयात माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांचा विक्रमी मताने विजय झाल्याबद्दल स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सत्कार व संवाद विकासासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये शहरातील वाहतूक समस्येवर चर्चा आयोजित केली जाणार असून अध्यक्षस्थानी परिषदेचे स्थानिक अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया राहणार आहेत. प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, सहयोग अर्बन बँकेचे चेअरमन रमेश अंबरखाने , उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, उदगीर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अभिषेक शिंदे ,ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी ,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष कुमार अय्यर ,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अलका डोके यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष प्रा. एस. एस. पाटील ,सचिव प्रा. प्रवीण जाहूरे, सहसचिव डॉ. दत्ता पाटील, कोषाध्यक्ष प्रा. महादेव खताळ ,सदस्य बाबुराव माशाळकर ,राम मोतीपवळे,मुरलीधर जाधव, अनिल पत्तेवार, माधव कल्याणकर, गणेश मुंडे प्रा. डॉ. दत्तहरी होनराव यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *