शिवकर्णा अंधारे यांच्या पुढाकाराने सोमनाथपूर येथे हळदी कुंकूवाचा कार्यक्रम संपन्न
सोमनाथपूर (एल.पी.उगीले) : येथील ग्रामपंचायत सदस्या सौ.शिवकर्णा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस स्टेशन येथील महिला कर्मचारी आणि अधिकारी यांच्या साठी हळदी कुंकू कार्यक्रमातून संक्रांत साजरी केली. पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांना, कर्मचारी महिलांना मनात असून देखील सण साजरा करण्यात अडचणी येत असतात.हे ओळखून मनकर्णा आंधरे यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले.
मकरसंक्रांती म्हंटले की, महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय येतो. संक्रांतीनिमित्त महिला आपल्या घरोघरी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करत असतात व वाण म्हणून एकमेकींना भेटवस्तू देतात. ग्रामपंचायत सदस्या सौ.शिवकर्णा अंधारे यांनी हळदी कुंकू कार्यक्रमांमध्ये सोमनाथपूर येथील सर्व महिला एकत्र येऊन हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरुवात केली. विशेष म्हणजे केवळ हळदी कुंकू कार्यक्रम न ठेवता सदर कार्यक्रमाअंतर्गत वाणाच्या रूपात देवाणघेवाण केली. सदैव सौभाग्यवती रहावे असे संदेश देत भेट वस्तूंचे वितरण करण्यात आले. शेवटी उखाण्याच्या औपचारिक कार्यक्रमाने सांगता झाली. या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ.अंबिका पवार, ग्रामीण पोलीस स्टेशनचे स पो नि अनुपमा केंद्रे , एच.सी. संध्या कुलकर्णी , एच.सी. स्वाती अतकरे , एल.सी.पी. कल्पना डिगे , एल.सी.पी. रेखा राठोड , एल.सी.पी. अनिता पात्रे , एल.सी.पी. मिरा समुधराव , एल.सी.पी. आर्या कालींदा , एल.सी.पी. देवकन्या डूरे , एल.सी.पी. सविता श्रीमंगले एल.सी.पी. जोशी , एल.सी.पी. हेमा हानमंते , एल.सी.पी.पाटील , सहशिक्षिका पवार सह परिसरातील 150 ते 200 पेक्षा जास्त महिलांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी क्रांती कांबळे, गंगा गिरी, ज्योती सुर्यवंशी यांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम यशस्वी केला.