विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक ज्ञान व जिज्ञासा वाढवणे गरजेचे: डॉ.संजय तोंडारकर
विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक ज्ञान व जिज्ञासा वाढवणे गरजेचे: डॉ.संजय तोंडारकर
गुत्ती (एल.पी.उगीले) घोणसी येथील उज्वला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिराच्या तिसऱ्या दिवशी ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे व नाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, 1200 जुने नाणे ,जुने 48 कुलूप, लाकडी शेवया गिरणी, 45 अडकिते, कंदील, दिवे, चिमण्या, वाघ नखा, तलवारी, फारशी, मोडी, आणि उर्दू भाषेतील कागदपत्रे इत्यादी साहित्य होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद गोरे यांनी केले.
या प्रदर्शनास गावातील प्रतिष्ठित नागरिक, जि. प. प्रा. शा. गुत्ती शाळेतील विद्यार्थी, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय गुत्ती येथील विद्यार्थी यांनी भेट देऊन ऐतिहासिक वस्तूबद्दल माहिती मिळवली.
हे प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यामध्ये इतिहास विभाग प्रमुख व कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय तोंडारकर, कार्यक्रमाधिकारी डॉ. सचिन घुगे, सहकार्यक्रमाधिकारी डॉ. दत्तात्रेय मोरे, डॉ. देविदास केंद्रे, डॉ दयानंद गुडेवार, विद्यार्थी प्रतिनिधी तुषार केंद्रे, विद्यार्थीनी प्रतिनिधी तेजस्विनी पाटील, आणि सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.गुत्ती (एल.पी.उगीले) घोणसी येथील उज्वला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिराच्या तिसऱ्या दिवशी ऐतिहासिक वस्तू, कागदपत्रे व नाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आले.या प्रदर्शनामध्ये पाण्यावर तरंगणाऱ्या विटा, 1200 जुने नाणे ,जुने 48 कुलूप, लाकडी शेवया गिरणी, 45 अडकिते, कंदील, दिवे, चिमण्या, वाघ नखा, तलवारी, फारशी, मोडी, आणि उर्दू भाषेतील कागदपत्रे इत्यादी साहित्य होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सदानंद गोरे यांनी केले.
या प्रदर्शनास गावातील प्रतिष्ठित नागरिक, जि. प. प्रा. शा. गुत्ती शाळेतील विद्यार्थी, ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय गुत्ती येथील विद्यार्थी यांनी भेट देऊन ऐतिहासिक वस्तूबद्दल माहिती मिळवली.
हे प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यामध्ये इतिहास विभाग प्रमुख व कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय तोंडारकर, कार्यक्रमाधिकारी डॉ. सचिन घुगे, सहकार्यक्रमाधिकारी डॉ. दत्तात्रेय मोरे, डॉ. देविदास केंद्रे, डॉ दयानंद गुडेवार, विद्यार्थी प्रतिनिधी तुषार केंद्रे, विद्यार्थीनी प्रतिनिधी तेजस्विनी पाटील, आणि सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
