व्यायामाने शरीर तर योगासनाने मन तंदुरुष होते: डॉ सचिन घुगे
उदगीर (एल.पी.उगीले) घोणशी येथील
उज्वल ग्रामीण महाविद्यालय , राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आयोजित विशेष वार्षिक युवक शिबिर संपन्न होत आहे. या शिबिरामध्ये सर्व स्वयंसेवकांना शारीरिक कसरती बरोबर योगासने आणि ध्यानधारनेचे प्रशिक्षण नियमित दिले जात आहे. व्यायामामुळेच शरीर निरोगी राहते तर योगामुळे मन शांत व एकाग्र होते असे प्रतिपादन डॉ. सचिन घुगे यांनी केले. या उपक्रमात कार्यक्रमाधिकारी डॉ.संजय तोंडारकर सह-कार्यक्रमाधिकारी डॉ.दत्ता मोरे, केशव तिडके, महादेव केंद्रे, अभिजीत नादरगे, तुषार केंद्रे, सिद्धेश्वर केंद्रे, अजिंक्य केंद्रे, प्रेम घुले ,संतोष केंद्रे, श्याम केंद्रे, बालाजी केंद्रे, बालाजी सांगळे इ. स्वयंसेवक उपस्थित होते.
