पोलीस पाटील संघटनेचे विविध प्रश्नांच्या संदर्भात निवेदन!
vvलातूर (एल.पी.उगीले) जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे महाराष्ट्र राज्य गावाकमगार पोलीस पाटील संघ, लातूर तर्फे लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या रिक्त पद भरती संदर्भात निवासी जिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेण्यात आली.व त्यांना संघटने तर्फे जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या रिक्त पद भरती बद्दल निवेदन देण्यात आले.या वेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी पोलीस पाटील यांच्या शिष्टमंडळाला थांबवून समोरच सर्व माहिती मागवून घेतली, व जिल्ह्यात किती जागा मंजूर आहेत? व किती रिक्त आहेत? याची चौकशी केली. लवकरात लवकर पोलीस पाटील यांची पदभरती केली जाईल असे आश्वाशीत केले. यावेळी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष भाऊसाहेब सपाटे पाटील, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव पाटील, लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विश्वास नरले पाटील, जिल्हा सचिव कांचे पाटील, अहमदपूर तालुका अध्यक्ष संग्राम बरूरे पाटील, निलंगा तालुका अध्यक्ष संतोष नरहरे पाटील, उदगीर तालुका अध्यक्ष धनराज तौर पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी निवासी जिल्हाधिकारी यांनी पोलीस पाटील यांच्या अडिअडचणी बद्दल सविस्तर अशी चर्चा करून पोलीस पाटील यांच्या मागण्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन दिले.
