श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे स्वंयशासन दिन व निरोप समारंभ

0
श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर येथे स्वंयशासन दिन व निरोप समारंभ

उदगीर (एल.पी.उगीले)
श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे इयत्ता दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा स्वंयशासन दिन व निरोप समारंभ सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा मान्यवरांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचा तसेच स्वंयशासन दिनाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व शिक्षक यांचाही विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायकरावजी बेंबडे यांनी विचार मांडताना आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवा, असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आर. जी. नरले यांनी यश संपादनासाठी चिकाटी व परिश्रमाला पर्याय नाही असा मोलाचा सल्ला याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे उद्घाटक उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, जीवन देखील एक लढाईच असते, सत्कर्म करा आणि देशाला अजून बलवान करण्यासाठी योगदान दया. असे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या तहसीलदार श्रीमती भोसले यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, चिंता ही चित्तेसारखी असते म्हणून चिंता करू नका. तर प्रयत्नवादी बना, मेहनत करा. ध्येय निश्चित करून जीवनाची वाटचाल करा. परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षण या साधनात आहे. म्हणून शिक्षण घ्या, असा उपदेश भोसले यांनी केला. स्वंयशासन दिनाचे मुख्याध्यापक बेंबडे सोनाली, उपमुख्याध्यापक ओमकार गायकवाड, पर्यवेक्षक सायली कांबळे, शिक्षक प्रतिनिधी समीक्षा गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील अनुभवाचे कथन केले.

          हॅकॅथॉन  विज्ञान प्रदर्शनात मच्छरांचा नायनाट करण्यासाठी धुपबत्ती व अगरबत्ती बनविणे हा प्रयोग जिल्ह्यात प्रथम आला असून मार्गदर्शक नादरगे सी.बी व सहभागी विद्यार्थी कासले प्रतीक निवृत्ती व श्रीमंगले योगेश मारोती यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुरवठा विभागाच्या अधिकारी श्रीमती यलमले  व कल्लूर सज्जाच्या तलाठी श्रीमती ठाकूर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री देवकते पी. बी. यांनी केले. आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही. यांनी मानले. सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!