शास्त्री विद्यालयात गोळवलकर गुरुजी यांची जयंती साजरी
उदगीर (एल.पी.उगीले) येथील लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात गोळवलकर गुरुजी यांची जयंती उत्साहात साजरी झाली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा मारावार, विनायक इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी पडलवार, प्रमोदिनी रेड्डी तसेच मुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे, उपमुख्याध्यापक अरुण पत्की, पर्यवेक्षक माधव मठवाले,किरण नेमट अभ्यासपूरक मंडळ प्रमुख आशा गौतम, विजया गोविंदवाड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रमोदिनी रेड्डी म्हणाल्या की, गोळवलकर गुरुजींनी समाज हाच परमेश्वर समजून समाजाची सेवा करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केले. बालाजी पडलवार यांनी गुरुजींच्या जीवन कार्याची माहिती सांगितली.
अध्यक्षीय समारोपात विनायक इंगळे यांनी स्वयंसेवक तयार करण्याचे काम गोळवलकर गुरुजींनी केले, तसेच भारतातील विविध संस्थांना प्रेरणा देऊन पुढे आणण्याचे काम केले. असे मत इंगळे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती शेंडे तर प्रास्ताविक विष्णू तेलंग व नियोजन विद्यालयातील विद्यार्थिनींनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख अनिता मुळखेडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
