लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीने शासकीय रुग्णालयात ठिया आंदोलन
उदगीर (एल.पी.उगीले) येथील शासकीय रुग्णालयात लष्कर ए भीमा संघटनेच्या वतीने शासकीय रुग्णालय उदगीरच्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
शासकीय रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असून, औषध उपचार करण्यात येत नाहीत. सोनोग्राफी सेंटर बंद असून, एक्स-रे सेंटर सुद्धा बंद आहे. शासकीय डॉक्टरांनी खाजगी दवाखाने थाटल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. यावेळी तात्काळ उदगीर पोलिसांनी हस्तक्षेप करून, आंदोलकांची समजूत काढली. यावेळी शासकीय रुग्णालयात निवेदन देण्यात आले. व यापुढे अशा तक्रारी आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी नितीन एकुरकेकर, हबीब पठाण , राजकिरण शिंदे, सुशील माडळी, आशिष कोकणे, सय्यद सलीम, विकास बनशेळकीकर, बालाजी श्रीमंगले, अक्षय सावंत, राजू कांबळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
