दापका येथील ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन.
उदगीर (एल.पी.उगीले)
सीमाभागातील कमालनगर तालुक्यातील दापका येथे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उदघाटन ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, व ग्रामपंचायत सदस्य तसेच विलासराव जाधव, मोतीराम रावणगावे, बालाजी घरडे, संदीप औरादे, दयानंद जाधव, व्यंकट खंदाडे, भगवानराव जाधव, अंकुश वाडीकर, अनेक मान्यवर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सौ. पार्वतीबाई केरबा कांबळे तसेच ग्रामपंचायत उपाध्यक्ष निखील जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
