दावणगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आमदार चषक क्रिकेट सामन्याचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) तालुक्यातील दावणगाव येथील शिवनेरी मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आमदार संजय भाऊ बनसोडे मंडळातर्फे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती सिद्धेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या सामन्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 31 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 15000 रुपये तसेच बेस्ट बॉलर ,सलग तीन षटकार मारणाऱ्या खेळाडूस बेस्ट बॅट्समन , बेस्ट कीपर, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर यासाठी अकराशे रुपये रोख प्रत्येकी पारितोषिके दिली जाणार आहेत.
या सामन्याचे संयोजन धनाजी मुळे यांच्या नेतृत्वाखाली महेश भोळे, विजय पताळे, बाळासाहेब हुरुसनाळे, अनिल ढगे व अनिकेत भंडे करत आहेत. सामन्याचे पंच महादेव भद्रशेट्टे, दिनकर बिरादार ,विठ्ठल भंडे, शिवाजी भोळे हे काम पाहणार आहेत. सामन्याचे पारितोषिक वितरण माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.
