छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात कवीवर्य कुसुमाग्रज जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी.

0
छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात कवीवर्य कुसुमाग्रज जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी.

उदगीर (एल.पी.उगीले) छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात कवीवर्य कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे होते.त्यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. जयंती समिती व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ.मांजरे यांनी सांगितले की, कवी कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती यासाठी भरीव योगदान दिले.साहित्यातून समाज परिर्वतनाचा विचार लोकापर्यंत पोटतिडकीने पोहचवला.कुसुमाग्रज हे कवी,कादंबरीकार व नाटककार होते.त्यांच्या कवितेला भारतीय पातळीवरील ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. नटसम्राट या नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती समितीचे प्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले तर आभार डॉ.डी.बी.मुळे यांनी मानले. या कार्यक्रमास मराठी विभागातील डॉ.नरसिंग कदम, प्रा. गोविंद खराबे,महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!