छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात डोडला डेअरी कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात डोडला डेअरी कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

उदगीर (एल.पी.उगीले)येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाच्या दुग्धशास्त्र विभागाच्या वतीने डोडला डेअरी लिमिटेड, हैद्राबाद यांच्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्यू मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी १०:०० ते सायंकाळी 6:०० या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात हा इंटरव्यू संपन्न झाला.
या मुलाखतींसाठी केवळ उदगीरच नव्हे, तर इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सुद्धा या संधीचा लाभ घेतला. यामध्ये एकूण 40 विद्यार्थ्यांनी मुलाखतींसाठी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक ज्ञान, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिक क्षमता सिद्ध केली.डोडला डेअरी लिमिटेड मधून हैदराबाद येथून इंटरव्यू घेण्याकरिता नागेंद्र कुमार, वरिष्ठ व्यवस्थापक (मानव संसाधन), किरण कुमार, प्रादेशिक व्यवस्थापक महाराष्ट्र, ब्रम्हय्या, उपव्यवस्थापक (गुणवत्ता नियंत्रण), तृषाल, सहायक व्यवस्थापक (दुग्ध खरेदी), रवी चंदन, भरती कार्यकारी यांनी विद्यार्थ्यांना दुग्ध उद्योगातील संधी, गुणवत्ता नियंत्रण आणि दुग्ध व्यवसायातील आधुनिक प्रक्रिया तसेच शेतीविषयक अत्याधुनिक प्रक्रिया या विषयी माहिती दिली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे यांनी डोडला व्यवस्थापनाचे अभार व्यक्त करताना या संधीचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. असे आवाहन केले. व्यासपीठावर आय. क्यू.ए.सी. समन्वयक तथा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. विष्णू पवार उपस्थित होते.
महाविद्यालयाचा व्यवस्थापन समितीने या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना उद्योगाशी जोडणाऱ्या प्रयत्नांची प्रशंसा करत भविष्यात अशा अधिक संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर डोडला डेअरी व्यवस्थापनाने महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या तांत्रिक कौशल्ये आणि आत्मविश्वासाचा गौरव करत भविष्यातही अशाच कॅम्पस इंटरव्यू बाबतची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
हा कॅम्पस इंटरव्यू अत्यंत यशस्वी आणि फलदायी ठरला असून महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी उद्योग क्षेत्रात भविष्यातील वाटचाल सुकर करण्याच्या वचन पद्धतीचा दृढनिश्चय केला आहे.
या कार्यक्रमाचे संयोजक दुग्धशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर.बी.येडतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तर आभार प्रदर्शन डॉ. अनंत टेकाळे यांनी केले.
या कार्यकर्मासाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एच. ए. तीरपुडे सहयोगी प्राध्यापक डॉ. अनंत टेकाळे, डॉ.डी. बी. मुळे, हिंदी विभागाचे प्रा. बी. पी. सूर्यवंशी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्ही.डी. गायकवाड, यशवंत महाविद्यालयाचे प्रा.बाळासाहेब लांडगे इत्यादी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शिक्षकेतर कर्मचारी रमेश दरवेशवार, राजू बसगोंडा यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!