स्कायलाइन इंग्लिश स्कूल उदगीर चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) येथील स्कायलाइन इंग्लिशस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भैय्या निटूरे व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डाॅ रामप्रसाद लखोटिया तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे गणेश गायकवाड,सौ.बबीताताई भोसले,सतीश पाटील माजी सरपंच माणकी, परमेश्वर सोमवंशी, प्रा. राहुल अतनुरे, कनिष्क शिंदे, खाजासाब शेख ,सौ.साबेराबी शेख, ज्येष्ठ नेते महेताब अत्तार, नागेश पटवारी, विनोद गुरमे इ.उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रास्ताविकता प्रा.जावेद शेख यांनी केले. शाळेमध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित केलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यास सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर महीला पालकांसाठी आयोजित केलेल्या दांडिया महोत्सव, संगीत खुर्ची स्पर्धा, यामधील पारितोषिक प्राप्त महिला पालकांना सन्मानचिन्ह देउन गौरवण्यात आले.
त्यानंतर विजय भैय्या निटूरे यांनी विद्यार्थी व पालकाना मार्गदर्शन करताना संस्थेच्या स्थापनेपासून मी संस्थेच्या प्रगतीचा साक्षीदार असून ही शाळा एक उत्कृष्ट शाळा म्हणून तालुक्यामध्ये नावारुपास आलेली असले बाबत मत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर डाॅ.रामप्रसाद लखोटिया यांनी पारीतोषीके प्राप्त विद्यार्थी व पालकांचे अभीनंदन केले. व विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास पालकांची मोठी उपस्थिती पाहूनच शाळेची प्रगती व लोकप्रियता दिसून येत असून शाळेच्या प्रगतीमध्ये शाळा व्यवस्थापन व शिक्षकांचे योगदान अतिशय चांगले दिसून येत आहे. असे मत व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य भागीरथी गिरी यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे मत व्यक्त केले. तसेच शाळेमध्ये आयोजित केलेल्या वर्षभरातील विविध उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही सक्रिय सहभाग दिसून आला, या याबाबत समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, नृत्य, ड्रामा , मोबाईल परिणाम, महाराष्ट्राची लोकधारा,भारतीय विविध लोकनृत्ये, बॉलीवूड गीते, कोळीगीत , शेतकरीगीत, काॅमेडी, देशभक्ती, नारीशक्ती व शिवराज्याभिषेक सोहळा इ. गीताचे अतिशय मनमोहक सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पटणे व प्रा.गायकवाड के.व्ही यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्या शेख अंजुम, सहशिक्षिका सौ बिरादार रेखा, सौ.बिडवे मयुरी,बिराजदार भाग्यश्री, सौ.जोशी अश्विनी ,सौ तलवाडे एस.आर., सौ.संगीता पोलकर, रुपेश धोंगडे, मुजमील पटेल यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा समारोप सौ तलवाडे एस.आर यांनी उपस्थित पाहुणे, पालक व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त केले.
