महाबोधी महाविहार मुक्तीसाठी तीन दिवशीय धरणे आंदोलन
उदगीर (एल.पी.उगीले)
बोध्दगया येथे असलेल्या महाबोधी महाविहार हे जगभरातील बोध्द धर्मियांसाठी श्रध्दास्थान आहे. मात्र येथे हिंदूधर्मियांनी कब्जा केला आहे. याठिकाणी अघोरी विधी करीत आहेत. त्यामुळे या विहारात घुसखोरी करणाऱ्या हिंदू पासून महाबोधी महाविहार मुक्त करणाऱ्यासाठी देशभर आंदोलन सुरू असून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दि.4 मार्च ते 6 मार्च या काळात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
देशभर मोठ्याप्रमाणात महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन अधिक बळकट करण्यासाठी उदगीर येथील बोध्द अनुयायी तीन दिवशीय धरणे आंदोलन उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार आहेत. यासंदर्भात लेखी निवेन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून या निवेदनावर बाबासाहेब सुर्यवंशी, उत्तम गायकवाड बाबासाहेब कांबळे,मारोती भालेराव, बालाजी कांबळे,सूनील पकोळे, सूनील गोडबोले, भानुदास श्रंगारे, विठल शिंदे, माधव गायकवाड, नामदेव कवठाळे, मोहन सोमवंशी, ए. बी. पल्लेवाड, गवारे सोपान, कांबळे केराबाई, कबंळाबाई मादळे, सुंदरखबाई गायकवाड, यशोदाबाई उपाध्य, मनोहर माने, खंडू सोनकांबळे, पी. व्ही. सूर्यवंशी, दिलीप गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
