तीन दिवशीय धरणे आंदोलनास विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा
उदगीर (एल.पी.उगीले) : महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उदगीर येथील बोध्द समाजाच्या वतीने तीनदिवशीय महाधरणे आंदोलन केले. या आंदोलनास विविध पक्ष व संघटनांनी पाठिंबा देवून महाबोधी महाविहार बोध्दांच्या ताब्यात द्यावे, आशी मागणी केली. उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना आपल्या भावना कळवल्या आहेत.
बिहार राज्यातील बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे बोध्द बांधवांचे श्रध्दास्थान असून या विहारावर हिंदू धर्मियांनी ताबा मिळविला आहे. त्यामूळे हिंदू धर्मियांच्या ताब्यातून बोध्द विहार बोध्द भिकूच्या ताब्यात द्यावे, यासाठी जगभरातील बोध्द समाज एकवटला असून ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत. त्यास पाठिंबा देण्यासाठी उदगीर येथील बोध्द समाज दि. ४ मार्च ते ६ मार्च या काळात उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी बाबासाहेब सुर्यवंशी, मागासवर्गीय सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष मातीरावे पुंडलीक, उपाध्यक्ष शृंगारे भानुदास व पदाधिकारी, विद्यासागर डोळनाळीकर,शिवाजीराव देवनाळे, डाॅ. अंजुम खादरी, अभियान प्रमुख संजयकुमार, मैनोद्दिन पठाण, श्रावण किवंडे, ॲड. भालेराव जयवर्धन,ॲड. वर्षा कांबळे, संजय बोरगावे, उत्तम पकोळे, प्रकाश कांबळे, व्यंकट बर्गे, प्रा. सुदर्शन मसुरे, सुनील पकोळे,ॲड. अमोल तलवाडकर, सरपंच राजकुमार बिराजदार, प्रमे तोगरे, व्यंकट नेत्रगांवकर,भारतीय बौध्द महासभेचे एन. सी. कांबळे ॲड. श्रावण माने, प्रशांत सुर्यवंशी, मनोज जोगदंड, शरद कांबळे, गौतम गायकवाड, महेंद्र सुर्यवंशी, शिवकुमार कांबळे यशोदीप सुर्यवंशी, संग्राम गायकवाड, दशरथ वाघमारे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने तीन दिवस सहभाग नोंदवून आपल्या भावना व्यक्त केल्या.
