शास्त्री प्राथमिक शाळेची अहिल्यादेवी होळकर उद्यान परीसर स्वच्छता

0
शास्त्री प्राथमिक शाळेची अहिल्यादेवी होळकर उद्यान परीसर स्वच्छता

उदगीर (एल.पी.उगीले): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त ‘ प्रेक्षणीय स्थळास भेट व परीसर स्वच्छता’ या उपक्रमानिमित्त अहिल्यादेवी होळकर उद्यानामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, प्रमुख अतिथी म्हणून काशिनाथ रामराव शिंदे उपनिरीक्षक उपसंचालक कार्यालय लातूर व नरेंद्र संजयराव मेडेवार गटविकास अधिकारी पंचायत समिती जळकोट तसेच, संस्था पदाधिकारी शंकरराव विश्वनाथप्पा लासुणे, मधुकरराव गुंडप्पा वट्टमवार, बाळासाहेब केंद्रे मुख्याध्यापक लाल बहादूर शास्त्री विद्यालय उदगीर, सुहासिनीताई सुरशेटवार सामाजिक कार्यकर्त्या, सुनिताताई पाटील , प्रतिभाताई बिरादार महेश प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, व अंकुशराव मिरगुडे मुख्याध्यापक लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय यांची विशेष उपस्थिती होती.
व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार तसेच,प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
शाळेतील चि.व्यंकटनाथ सुधाकर पोलावार व कु.अनण्या गुरमे यांचा वाढदिवस मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते शुभेच्छा संदेश पत्र देऊन व औक्षण करून अभिष्टचिंतन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी काशिनाथ शिंदे यांनी संस्कारांची कमतरता जाणवत असल्याचे सांगितले.लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय,नेहमीच विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करीत असते.यातून विद्यार्थ्यांची चांगली जडणघडण होते. शाळेबद्दल गौरवोद्गार काढले.यापुढेही शाळेने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे सांगितले. गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार यांनी कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी सविस्तरपणे माहिती विद्यार्थ्यांना दिली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून खासकरून मुलींनी प्रेरणा घेऊन,त्यांच्याप्रमाणे कार्य करण्याचे आवाहन केले.
सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उद्यानाची व परीसराची स्वच्छता केल.सुत्रसंचलन,स्वागत व परिचय सौ.भाग्यश्री स्वामी यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी तर, आभार सौ.श्रीदेवी कबाडे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!